Type Here to Get Search Results !

“एक संजय तो गया दुसरा जल्द...”; ‘यांची’ संजय राऊतांवर टीका!

 


मुंबई: काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कॉ-लोकेशन घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने ही अटक केली आहे. तसेच,  शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. ईडीने संजय राऊतांना आज बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. अशातच आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केले आहे.



भाजपच्या मोहित कंबोज यांनी आज सकाळी ट्विट करत म्हणाले, 'एक संजय तो गया दुसरा जल्द ….' असे सूचक  ट्विट करत मोहित कंबोज यांनी  संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.  




दरम्यान,  माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सर्व प्रकरण बाहेर काढण्यात पडद्यामागून मोहित कंबोज यांनी काम केल असल्याची माहिती मिळत आहे.  तसेच, आता कंबोज यांचे हे ट्विट शिनसेना नेते संजय राऊत यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies