Type Here to Get Search Results !

कारचा अपघात; एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू!



कर्नाटक : कर्नाटक राज्यातील काेप्पल जिल्ह्यातील कुकानुरु तालुक्यातील भानपुरा येथे भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू तर तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना  घडली आहे. या घटनेत कारला धडक देऊन घटनास्थळावरून पळून गेलेल्या अन्य वाहन चालकाचा पोलिसांनी शोध घेत आहेत. 



कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील कुकानुरू तालुक्यातील भानपुरा येथे शनिवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात देवप्पा कोप्पाडा (६२), गिरिजम्मा (४५), परव्वा (३२), शांतम्मा (२२) आणि कस्तुरम्मा यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात हर्षवर्धन, पल्लवी, पुट्टाराजू आणि भूमिका हे गंभीर जखमी झाले आहेत.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  या अपघातामधील लोक एका वाढदिवसाच्या कार्यक्रमास गेले होते. त्यानंतर पुन्हा गावी जाताना अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळावरून कारला धडकलेल्या वाहनाचा मड गार्ड जप्त केला आहे. संबंधित चालकाला पकडण्यासाठी पूरावा गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या भागात सातत्याने टिप्पर लॉरींची ये-जा सुरू असते. या अपघातात टिप्पर लॉरीपैकी एखादे वाहनाने धडक दिली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



दरम्यान, धडकेमुळे वाहनाचा पूर्ण चुरा झाल्याने मृतदेह बाहेर काढताना अडचणी निर्माण झाल्यात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies