Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार ६ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सरकारी कर्मचार्‍यानी दुविधा टाळावी.  जवळचे मित्र भेटतील. परक्या व्यक्तींपासून दूर राहावे. या आधीचा कामातील अनुभव उपयोगी पडेल.

वृषभ:-

आवश्यकता असेल तरच बोलावे. दिवस मजेत जाईल. गोडीगुलाबीने कार्य साधाल. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल.



मिथुन:-

कामाच्या स्वरुपाचे नवीन मार्ग शोधावेत. आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होईल. मनात नसती शंका आणू नका. क्षणिक मोहात पडाल. स्वत:वर खर्च कराल. 

कर्क:-

आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. पुढील गरजांसाठी आत्ताच खर्च कराल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील.



सिंह:-

वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.  व्यावसायिक कामातून चांगला लाभ मिळवाल. दिवस आनंदात जाईल. नवीन विचार जोपासले जातील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.


कन्या:-

धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. आपल्या समोरील व्यावसायिक संधी ओळखा. त्यातून तुमची सकारात्मकता वाढेल. पत्नीशी वाद वाढवू नका. ग्रह बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल.



तूळ:-

अचानक धनलाभाची शक्यता. जुनी देणी भागवता येतील. योग्य गुंतवणूक करू शकाल. कमी श्रमातून कामे साध्य करता येतील. रेस, जुगार यातून कमाई कराल.


वृश्चिक:-

प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील.  व्यावसायिक अनुकूलता लाभेल. नवीन लोकांशी परिचय वाढवता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मित्रांच्या ओळखीतून लाभ होईल.



धनू:-

मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील. तुमच्यातील कल्पकतेला वाव देण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोकांकडून कामे सुरळीत पार पडतील. त्यातून नवीन विचारांना चालना देता येईल.


मकर:-

कामाचा योग्य आराखडा तयार ठेवावा. अधिक चपळाईने कामे करता येतील. उगाचच येणारा आळस टाळावा लागेल. ऐनवेळी होणारी गडबड टाळावी. कलेचा मनमुराद आस्वाद घ्याल.



कुंभ:-

दिवस आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार घालवाल. घरात टापटीप ठेवाल. नवीन ओळखी करून घ्याव्यात. भडक शब्द वापरणे टाळा. घरातील काही कामे स्वत:हून अंगावर घ्याल.


मीन:-

केलेल्या निश्चयानुसार वागावे. कामासाठी काही वेगळे पर्याय शोधावेत. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. जुने मित्र गोळा कराल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies