Type Here to Get Search Results !

‘इतक्या’ रुपयांचे लाईट बिल पाहताच सुनेचा वाढला बीपी, तर सासऱ्यांचा वाढला रक्तदाब!



नवी दिल्ली:  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये वीज विभागाने एका कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचे बिल दिल्याने सासरे आणि सुनेला मोठा धक्का बसला. या वीज बिलातील आकडा पाहून सुनेचा बीपी वाढला आहे, तर सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या शिव बिहार कॉलनी येथील आहे. येथे राहणारे संजीव कनकणे हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांची पत्नी प्रियांका गुप्ता गृहिणी आहे. त्यांचे जुलै महिन्यातील वीज बिल ३४ अब्ज रुपयांपेक्षा जास्त आले, ते पाहून त्यांची पत्नी प्रियंका यांचा बीपी वाढला आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडली. तर त्यांचे वडील राजेंद्र प्रसाद गुप्ता यांना अगोदरच हृदयाचा त्रास आहे. त्यांना आलेले बिल पाहून त्यांचा रक्तदाब वाढला. यानंतर वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.


दरम्यान,  यानंतर वीज कंपनीने त्यांच्या बिलात दुरुस्ती केली. आता संजीव यांचे वीज बिल फक्त १३०० रुपये आले आहे.तसेच, 'ही आमच्या कर्मचाऱ्याच्या हातून चूक झाली होती, ती आता सुधारण्यात आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वीज कंपनीचे महाव्यवस्थापक यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies