Type Here to Get Search Results !

दारुसाठी पैसै दिले नाही म्हणून भावानेच केला भावाचा खून!



अकोला : अकोल्यात आई- वडिलांनी दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही, याचा राग मनात धरुन रणधीरसिंह उल्हाससिंह चव्हाण लोखंडी शस्त्राने आपल्या जन्मदात्या माता-पित्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर मोठा भाऊ प्रितमसिंह याने रणधीरसिंहच्या हात्यातील शस्त्र हिसकावून त्याच्या शरीरावर वार केले. या हल्ल्यात रणधीरसिंहचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी प्रितमसिंह उल्हाससिंह चव्हाण याला मुर्तीजापूर पोलिसांनी अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मुर्तीजापुर दर्यापूर रोडला लागून असलेल्या सिरसो गायरान या भागात राहणारा रणधीर सिंह उल्हास सिंह चव्हाण दारु पिण्यासाठी आई-वडिलांकडे पैसे मागत होता. मोठ्या भावाने आणि त्याच्या पालकांनी पैसै देण्यास नकार दिला. त्यानंतर रणधीर सिंह याने रागाच्या भरात धारधार शस्त्राने त्याच्या आई-वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रणधीर सिंहचा मोठा भाऊप्रितमसिंह उल्हाससिंह चव्हाण याने त्याच्या हातातील शस्त्र हिसकावून त्याची हत्या केली.



दरम्यान,  या घटनेची माहिती मिळताच मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोविंद पांडव व उपनिरीक्षक सत्यजित मानकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपी प्रितमसिंह उल्हाससिंह चव्हाण याला पोलिसांनी अटक केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies