Type Here to Get Search Results !

“या” शिवसेनानेत्याच्या सैनिकावर खूनी हल्ला; या गटाच्या सहा जणांवर गुन्हा दाखल...



सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे यांच्यावर लोखंडी गजाने खुनी हल्लाि केल्याप्रकरणी तिघा संशयितांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


शिवकुमार शिंदे हे सोमवारी सकाळी दूध घेवून मोटारसायकलवरून घरी निघाले होते. मंत्री कॉलनी ते हनुमाननगर रस्त्या दरम्यान संशयितासह त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी शिवकुमार यांची मोटारसायकल अडविली. लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर, पायावर, पाठीत मारहाण केली. या मारहाणीत शिवकुमार यांच्या पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली.


 दरम्यान खुनी हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचा तालुकाप्रमुख शिंदे गट सागर मलगुंडे याच्यासह त्याच्या सहा साथीदारांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटात या म्हणून हल्ला केल्याचे आरोप नगरसेविका प्रतिभा शिंदे आणि त्याचे पती शिवकुमार दिनकर शिंदे यांनी केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies