Type Here to Get Search Results !

‘या’ तरूणीने चक्क ‘नऊ कोटी’च्या पॅकेजची संधी सोडून घेतला संन्यास!जळगाव :  वर्षाअखेरी  नऊ कोटी रुपयांचे पॅकेज मिळत असताना उच्चशिक्षित  तरुणीने वयाच्या 22 व्या वर्षी संन्यास घेतला. दिक्षा बोरा असे या तरुणीचे नाव आहे. दिक्षा बोरा आताचे संयमश्रीजी महाराज यांनी BBA मधून पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले. दिक्षा बोरा या राष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडू आहेत. संयमश्रीजी महाराज म्हणजेच आताच्या दिक्षा बोरा यांचा संन्यास घेण्याअगोदरचा जीवन प्रवासही रंजक आहे. त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. तसेच त्या सुखी व श्रीमंत परिवारातून असून कॅलिफोर्निया येथील कंपनीने त्यांना व्यक्तिमत्व विकासाचा जॉब ऑफर करताना तब्बल नऊ कोटीचे पॅकेज देण्याचे कबूल केले. परंतु, ही संधी न स्वीकारता त्यांनी संन्यास घेणेच पसंत केले.याबद्दल बोलताना दिक्षा बोरा म्हणाल्या,  जीवनात पैसाच सर्व काही नसतो. आपल्या मनाचा आनंद कशात आहे, हे देखील महत्वाचे असते. आनंद गुरूच्या चरणी मिळतो. म्हणुन ठरवले की गुरूच्या चरणी जायचे. नऊ कोटींचा आकडा ऐकल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटते. परंतु मला अजूनही वाटत नाही की, मी नऊ कोटी रुपये सोडून आले. पैशांमागे धावण्यापेक्षा आपण कमावलेल्या पैशात सुखी आहोत का? आपल्या जीवनात आपण सुखी आहोत का? याचा शोध आपण घेतला पाहिजे असे वक्तव्य  दिक्षा बोरा आताच्या संयमश्रीजी महाराज यानी केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies