Type Here to Get Search Results !

चक्क नशेसाठी तरुणांकडून कंडोमचा उपयोग!

 


नागपूर : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर शहरात कंडोमचा उपयोग नशेसाठी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांपासून संरक्षण होण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो. परंतु, पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर येथील तरुण त्याचा वापर ड्रगप्रमाणे करत आहेत.याबद्दल अधिक माहिती अशी कि,  गेल्या काही दिवसांपासून दुर्गापूरमधील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, बेनाचिती आणि मुचीपारा, सी झोन, ए झोन अशा विविध भागात फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे एका स्थानिक दुकानदाराने वारंवार कंडोम खरेदी करणाऱ्या तरुणाला विचारले. तर मी नशेसाठी ते विकत घेतो, असे उत्तर त्याने दिले.तसेच, दुर्गापूर येथील एका मेडिकल स्टोअरचालकाने सांगितले की, पूर्वी दिवसाला केवळ 3 ते 4 पॅकेट कंडोम विकले जात होते, मात्र आता पूर्ण पॅक विकले जात आहेत.


तज्ज्ञांच्या मते कंडोममध्ये एक सुगंध असतो. त्याची नशेखोर नशा करतात. कंडोम मधील हे सुगंधी संयुग डेंड्राइट गममध्ये देखील आढळते. त्यामुळे अनेक लोक नशेसाठी डेंड्राइटचाही वापर करतात. गरम पाण्यात कंडोम जास्त वेळ भिजवून ठेवल्याने नशा होते. तरुण पिढीमध्ये काही तरुण जे नैराश्यामध्ये गेलेले किंवा चिंताविकाराने ग्रासले असतात ते नशेच्या आहारी जातात आणि त्यातून नशा करण्याचे वेगवेगळे मध्यम ते निवडतात.ड्रग्ज महाग आणि सहज उपलब्ध होत नसल्याने अशा प्रकारच्या वस्तूंपासून ते नशा करतात. मात्र, अशा प्रकारच्या वस्तू किंवा पदार्थांपासून नशा केल्यानं त्यांच्या फुफ्फुस आणि मेंदू यावर त्याचा परिणाम होतो. शिवाय त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ढासाळते.

 


दरम्यान, नशेसाठी विचित्र गोष्टी वापरण्याची ही पहिलीच घटना नाही. 21 व्या शतकाच्या मध्यात, नायजेरियामध्ये टूथपेस्ट आणि शूच्या शाईची विक्री अचानक वाढली होती. यावेळी लोक त्याचा नशेसाठी वापर करायचे. मात्र, ही चिंतेची बाब असून या तरुणांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.(सौ.साम)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies