Type Here to Get Search Results !

आमदार संजय शिरसाट यांचे मुंबईत शक्तीप्रदर्शन; शिरसाठ यांना मंत्रीपद मिळणार?



औरंगाबाद : एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट आज मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी औरंगाबादहून संजय शिरसाट यांचे 500 ते 600 कार्यकर्ते पोहचणार असल्याची माहिती समोर येत आहे. 



संजय शिरसाट हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र, गेल्या साडेसात वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागावी यासाठी संजय शिरसाट प्रयत्नशील आहेत. त्यासाठी वर्षावर शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांसह संजय शिरसाठ पोहोचणार आहेत. 



दरम्यान,  शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या बंडात आमदार संजय शिरसाट यांची भूमिका सुरूवातीपासून महत्वाची राहिलेली आहे. त्यामुळे शिरसाठ यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आगामी मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री पद आणि औरंगाबादचे पालकत्व पालकमंत्री पद मिळावे यासाठी संजय शिरसाट प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुकूल असल्याचाही दावा कार्यकर्ते करीत असल्याचे बोलले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies