Type Here to Get Search Results !

‘असा’ वडिलांना मेसेज केल्यानंतर वसतिगृहात मुलाची हत्या!



अमरावती : अमरावती येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व तेथेच वसतिगृहात राहणाऱ्या आदर्श नितेश कोगे वय वर्ष १३ रा. जामली या आदिवासी विद्यार्थ्याचा दिनांक २१ जुलै रोजी वसतिगृहात मृतदेह आढळला होता. मात्र, आदर्शचे नाक तोंड दाबून कोणीतरी त्याची हत्या केली असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर  आले  आहे.



याबद्दल धिक माहिती अशी कि,  मृतक आदर्श याने आपल्या वडिलांना मृत्यूच्या एक दिवस आधीच फोन केला होता. यावेळी त्यांने, 'मुझे यहा नही रहना, मुझे यहा बहुत मारते है!' असे सांगण्याचा प्रयत्न तो करत असतानाच फोन कट झाला होता. शिवाय "मुझे बहुत मारा" असे लिहलेला एक मेसज त्यांने वडिलांना पाठवला होता. त्याच्या या फोन आणि मेसेजमुळे त्याला कोणी तरी मारल्याचा संशय घरच्यांना आल्याने त्यांनी वसतिगृह प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत विद्यार्थ्याचे वडील नितेश कोगे यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांकडे एका तक्रारीतून केली होती.



दरम्यान, आदर्शचे शवविच्छेदन अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा करण्यात आले यात त्याचा नाक आणि तोंड दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वसतिगृहाचे वार्डन रवींद्र पांडुरंग तिखाडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies