Type Here to Get Search Results !

माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी तरुणाने केले धक्कादायक कृत्य!



जालना : जालन्यात जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या दाभाडी गावात बायको मला सोडून माहेरी गेली, तिला परत आणा अन् मला घरकूल द्या, या मागणीसाठी एक तरुण चक्क दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढला. गणपत बकाल असे या तरुणाचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावातील गणपत बकाल नामक तरुण हा बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मोबाईल टॉवरवर चढला. माझी बायको माहेरी गेली, तिला परत आणा, तसेच मला घरकूल मिळवून द्या अशी मागणी या तरुणाने केली. सदरील तरुणाने दारूच्या नशेत हे कृत्य केले.  गावकऱ्यांनी या तरुणाला टॉवर वरून खाली उतरण्यासाठी खुप प्रयत्न केले.पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला. मात्र पोलिसांनी खाली उतरण्याचे आवाहन करून सुद्धा तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्निशमन दलाचे पथक मागविण्यात आले मात्र तेही त्याच्यासमोर हतबल झाले. गणपत हा दारूच्या नशेत असल्याने अनेकांनी त्याची मजा घेतली.तसेच,  "तुला आमदार करतो, खाली उतर" अशी गळ घातली. पण तरीही तो खाली उतरण्यास तयार झाला नाही. 



दरम्यान, तब्बल 4 तासाने गणपत हा टॉवर खाली उतरला. त्यानंतर बदनापूर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies