Type Here to Get Search Results !

राऊतांच्या सत्तांतराच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, "संजय राऊत यांना..."!



मुंबई : राज्यात पुन्हा सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी केले होते. मात्र आता  राऊत यांच्या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


“संजय राऊत यांना त्यांच्या स्वप्नात राहू द्या, आम्हाला १६० आमदारांचा पाठींबा आहे. गटनेते, प्रतोद आमचा झाला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार ही होईल. लोकसभेतही १२ खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिले आहे. दोन्ही सभागृहात आमच्याकडे बहुमत असून सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या”अशी प्रतिक्रिया देत शिंदे यानी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.



दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे जेष्ठ नेते लिलाधर डाके यांची सदिच्छा भेट घेतलीआहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांच्या विधानावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies