Type Here to Get Search Results !

“शिंदेंना सोडा, मी सगळा पक्ष घेऊन येतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा” ; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन?



मुंबई:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी आधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. अशी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना सोडा, मी सगळा पक्ष घेऊन येतो अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली होती अशी माहिती समोर आली आहे.



मी सगळा पक्ष घेऊन भाजपसोबत येतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा असे संभाषण उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केल्याची माहिती मिळत आहे. 



दरम्यान,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे आता शिवसेनेत उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर होणार असल्याचे बोलले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies