Type Here to Get Search Results !

व्हिडीओ: पूर आलेल्या नदीत तरुणाने घेतली उडी; पुरात तरुण बेपत्ता!



मालेगाव, नाशिक:  पूर आलेल्या गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता झाला आहे. या तरुणाचा शोध सुरू झाला असून अद्यापही तो सापडलेला नाही. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातली ही दुर्देवी घटना असून तरुणाचा उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 



मागील आठवडाभरापासून राज्यात  पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कळवण, बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तिथल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. मालेगावमधून वाहणाऱ्या गिरणा नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आला असून पुरामुळे त्यावरुन पाणी वाहत आहे. याच पुराच्या पाण्यात गिरणा नदीच्या पुलावरुन एका तरुणाने उडी मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. उडी मारल्यानंतर हा तरुण बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.



दरम्यान,  मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies