Type Here to Get Search Results !

शिंदे गटातील आमदारांची मंत्रीपदासाठी रस्सीखेच; अब्दुल सत्तार यांनी दिली ‘हि’ महत्त्वाची माहिती!



मुंबई:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. मात्र अजूनही  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. परंतु, मंत्रिमंडळ विस्तार रखडला असतानाही शिंदे गटात मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार हे  दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. 



तसेच, मी आमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. राजीनामा देणारा मी आमच्या पन्नास आमदारांपैकी पहिला असेन असे, सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.



याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणाला किती मंत्रीपदे मिळणार याबाबत चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. ३ ऑगस्टच्या आत शपथविधी सोहळा होईल, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies