Type Here to Get Search Results !

फेसबुकवरील ओळखीतून घटस्फोटित महिलेवर लैंगिक अत्याचार!



पिंपरी-चिंचवड: फेसबुकवर ओळख झालेल्या एकाने घटस्फोटित महिलेशी मैत्री केली. त्यानंतर जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार जानेवारी २०१८ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत सांगवी, विमाननगर, बालेवाडी येथे घडल्याचे समोर आले.



याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, , फिर्यादी महिलेचा घटस्फोट झाला आहे. आरोपी आणि फिर्यादी यांची फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांशी ओळख झाली. त्याद्वारे आरोपीने फिर्यादींसोबत मैत्री करून जवळीक साधली. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार केला.



दरम्यान,  अजय रमेश बोतालजी (वय ४७, रा. बिबवेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय पीडित महिलेने सोमवारी (दि. १८) सांगवी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखला केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies