Type Here to Get Search Results !

प्रख्यात वास्तू चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्ये संदर्भात सीसीटीव्ही फुटेज आले समोर

 


हुबळी : कर्नाटकातील प्रख्यात वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली होती. हुबळीतील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

हॉटेलच्या लॉबीमध्ये दोघे हल्लेखोर चंद्रशेखर गुरुजींच्या येण्याची वाट बघत होते. गुरूजी आल्यानंतर एक हल्लेखोर त्यांच्या पाया पडला. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्या दोघांनी गुरूजींवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते.

वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी हत्याकांडाच्या काही तासांनंतर दोन्ही आरोपी मंजुनाथ मारेवाड आणि महांतेश याला रामदुर्ग येथून अटक केली.

अटक केलेल्या हल्लेखोरांची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रशेखर गुरूजी यांची हत्या का केली, याचे कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

v

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies