Type Here to Get Search Results !

आमदार संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी!



मुंबई: उद्धव ठाकरेंसाठी ढसाढसा रडणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांची हकालपट्टी केली आहे. 



शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर बांगर हे मुंबईतून आपल्या मतदार संघात परतले आणि उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे सांगत रडले होते परंतु,  बहुमत चाचणीच्या एक दिवस आधीच ते पुन्हा शिंदे गटात गेले.



दरम्यान,  एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आमदार संतोष बांगर यांनी शेवटी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केले. यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies