ट्रकखाली आली गर्भवती महिला; महिलेचा जागीच मृत्यू, अर्भक सुस्थितीत!उत्तर प्रदेश: फिरोजाबादमध्ये बरतारा गावामध्ये ट्रकखाली एक गर्भवती महिला सापडली. तिचे पोट फाटून अर्भक बाहेर आले. व महिलेचा जागीच मृत्यू झाला होता, पण तिच्या गर्भातून बाहेर पडलेले अर्भक सुस्थितीत होते. या अर्भकाला फिरोजाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि,  पती-पत्नी मोटारसायकलवरून जात होते. यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते ट्रकखाली आले. ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचे पोट फाटले आणि मूल बाहेर पडले. ते रडायला लागले म्हणून लोकांनी आवाज ऐकून तिकडे धाव घेतली. महिलेचा मृत्यू झाला होता. यामुळे लोकांनी मुलाला उचलून तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासले असता ते ठीक असल्याचे दिसले. त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. महिलेचे गर्भाशय फाटल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पतीसोबत ती तिच्या माहेरी जात होती. तेव्हा हा अपघात झाला आहे. दरम्यान,  अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पतीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured