Type Here to Get Search Results !

तरुणाचे निसर्गाच्या सानिध्यात कपड्यांविना फोटोज् व्हायरल!नवी दिल्ली: लडाखची रोड ट्रिप हा असा प्रवास आहे जो पर्यटनाची आवड असलेल्या प्रत्येकाला करायचा आहे. अनेकांनी हे स्वप्न सत्यात उतरवले, तर अनेकजण ते पूर्ण करण्याच्या बेतात आहेत. दरम्यान, इंस्टाग्रामवर एका व्यक्तीचे फोटो समोर आले आहेत. यात त्याने लेह-लडाखच्या टूरला त्याच्या खास पद्धतीने संस्मरणीय बनवले आहे. टॅटोग्राफर करण नावाच्या या व्यक्तीने लडाखमधील सुप्रसिद्ध पॅंगोंग तलावावर न्यूड फोटोशूट केले आहे. करणचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
करण हा सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर आहे आणि तो त्याच्या टॅटूंमुळे आधीही चर्चेत आला आहे. तो जगातील पहिला पूर्णपणे मॉडिफाईड बॉडीबिल्डर आहे. म्हणजे त्याच्या अंगावरच नाही तर त्याच्या डोळ्यातही काळ्या शाईने टॅटू काढला आहे. आहे. गिनीज बुकमध्येही  त्याचे नाव रेकॉर्डवर आहे. लडाखमधील पॅंगॉन्ग लेक हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. थ्री इडियट्स चित्रपटात दाखवण्यात आलेला तलाव, जिथे सीनचा शेवट शूट करण्यात आला होता, तो पॅंगॉन्ग लेक होता. याशिवाय चीनसोबतच्या सीमावादावरून पॅंगोंग सरोवरही खूप चर्चेत होते. हे १३४ किमी लांबीचे सरोवर भारतापासून चीनपर्यंत पसरले आहे.पॅंगॉन्ग लेकवर नग्न का गेलास? असं विचारलं असता त्याने उत्तर दिलं की, तो निसर्गप्रेमी आहे, म्हणून त्याने हे केले. त्याला कोणी अडवले नाही का? या प्रश्नावर करणने सांगितले की, तलाव खूप दूरवर पसरला आहे. ज्या ठिकाणी त्याने फोटो क्लिक केले, तिथे एकही माणूस काय साधा प्राणीही नव्हता. करण पुढे म्हणाला, 'मला विश्वास आहे की पॅंगॉन्ग लेक हा एक शांत आणि सुंदर परिसर आहे, जिथे जो कोणी जाऊन पूर्णपणे न्यूड होऊन बसेल तर त्याचा अनुभव वेगळा असेल.'

करणने असेही सांगितले की तो लडाखला एकट्याने सहलीला (सोलो ट्रिप) गेला आहे, म्हणजे त्याच्यासोबत दुसरे कोणीही नव्हते. संपूर्ण टूरमध्ये फक्त त्याची बाईक आणि कॅमेरा करणसोबत असतो. ट्रायपॉडवर कॅमेरा लावून त्याने हे फोटोही क्लिक केले आहेत. करणचे वडील फोटोग्राफर आहेत, यामुळे करणला चांगले फोटो कसे क्लिक करायचे हे देखील माहित आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ईशान्येच्या दौऱ्यावरही करण एकटाच गेला होता.

न्यूड होण्याबाबत त्याला विचारलं असता करण म्हणाले की, त्याने याआधी गोव्याच्या बीचवर असेच केले आहे. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर काही द्वेषयुक्त टिप्पण्या आल्या आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला की, नाही, असे अद्याप झालेले नाही. न्यूड फोटोंवर एक-दोन विनोदी कमेंट्स वगळता कोणीही चुकीचे लिहिलेले नाही. करण म्हणतो की कदाचित त्याला फॉलो करणारे कलाप्रेमी असतील आणि अशा फोटोंमागचा उद्देश त्यांना समजतो. (सौ. साम)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies