Type Here to Get Search Results !

विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते खुर्चीसाठी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच?



मुंबई:  सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. आता विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेत्याच्या पदासाठीही राष्ट्रवादी कॉंग्रेस इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे तर शिवसेनेलाही विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते पद हवे असल्याची बोलले जात आहे. 



विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेसह राष्ट्रवादीचीही नजर आहे. विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची निवड झाल्याने  शिवसेनेचा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर डोळा आहे. विधान परिषदेत एकूण सदस्यसंख्या ७८ असते, यामध्ये शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस दोघांकडेही १०-१० आमदार आहेत. त्यामुळे आमचे सदस्य जास्त असल्याने विरोधीपक्षनेते पद आम्हाला द्या अशी शिवसेनेची मागणी आहे.



तसेच,  सेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रवादी देखील या पदासाठी इच्छुक आहे. तर, भाजपशी लढण्यासाठी एकनाथ खडसेंसारखे अनुभवी नेते आहेत असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.


दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्षांकडे नाव पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies