“फडणवीस दिल्लीने तुमचा बकरा केला, तुमचा अपमान आम्हाला सहन...”: विनायक राऊत!कोल्हापूर : एकनाथ शिंदे तु्म्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेसाठी लाचारी किती असते, हे तुम्हीच दाखवून दिले, अशा शब्दात विनायक राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे.कोल्हापूरच्या शिवसेनेच्या मेळाव्यात राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राऊत यांनी आई जगदंबेकडे प्रार्थनाही केली. तुझी कृपा ठाकरे कुटुंबावर आणि शिवसेनेवर राहुदे. मी दिघेंना वंदन केले. मला आज खंत वाटते, तुम्ही ज्यांना मोठं केलं,त्यांनी हिंदुत्वाला नष्ट केलं. एकनाथ शिंदे तुम्ही भाजपची लाचारी पत्करली. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेसाठी लाचारी किती असते, तुम्हीच दाखवून दिले, असे म्हणत राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांच्या अनेक पिढ्यांचा राजेश क्षीरसागर यांनी जितका उद्धार केला, तितका कुणीच केला नसेल. चाळीस जणांना मंत्रिपदाच आश्वासन दिलं. देवेंद्र फडणवीस तुम्ही बहुरूपी आहात, हे दिल्ली ने दाखवून दिलं. दिल्लीने तुमचा बकरा केला. फडणवीस उद्याचे गृहमंत्री होते, तुमचा अपमान आम्हाला सहन होत नाही.हिम्मत असेल तर लाथ मारून बाजूला व्हा,असा सल्लाही राऊत यांनी फडणवीसांना दिला.दोनवेळा आमदारकी दिली तिसऱ्यांदा उमेदवारी दिली अशावेळी शिवसेना महत्वाची नाही असे म्हणत आहेत. तुमच्या कपाळावर गद्दार हा शिक्का बसला आहे. अंबाबाईच्या कोर्टात तुम्हाला माफी नाही. स्वत:ला वाचवण्यासाठी ही व्यक्ती काहीही करु शकते. काम होईपर्यंत हा माणूस पाया पडतो नंतर पाय देखील ओढतो.चंद्रकांतदादा तुम्ही अशा माणसापासून सावध राहा, असेही राऊत म्हणाले.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास ४० आमदार सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. अशातच आता शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवकही शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याने शिवसेनेची राजकीय कोंडी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन करत मेळावा भरला. या मेळाव्यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली  आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured