Type Here to Get Search Results !

लग्नात नृत्य करताना तरुणींनी केले अश्लील भाव, म्हणून तरुणींना....!



कोल्हापूर: कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्याच्या भादोले गावात  लग्नाच्या वरातीत अश्लील हावभाव करत नृत्य करणाऱ्यांना तरुणींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच,  या  दोन नृत्यांगणांसह आठ जणांवर वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  भादोले गावात एका लग्नाच्या वरातीत नाचण्यासाठी दोन नृत्यांगणांना बोलवण्यात आले होते. तेव्हा या नृत्यांगणांनीही नाचायला सुरुवात केली, यावेळी नाचताना त्यांनी काही अश्लील हावभाव केले. पुण्यात राहणाऱ्या युगश्री शेरकर आणि अंजली थापा असे या दोन नृत्यांगणांचे नाव असून त्या इन्स्टाग्रामवरही प्रसिद्ध आहेत, तसेच त्यांच्या फॉलोअर्सही संख्याही हजारोंच्या घरात आहे. लग्नात सार्वजनिकरीत्या अश्लील हावभाव आणि नृत्य केल्याने या दोघींसह इतर आठ जणांवर वडगाव पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान,  कोल्हापूरात या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies