नागपूर : राज्य सरकारने नागपूरचे माजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी सुचवलेल्या जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीतीच्या साधारण ३८ कोटींच्या कामांना स्थगिती दिल्यामुळे आता डीपीसीतील कामे थांबली आहेत. डीपीसीतून झालेल्या जुन्या कामांची सरकार समिक्षा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकार काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे, तर काही कामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. आता नागपुरातील काही कामांना स्थगिती दिली आहे.