Type Here to Get Search Results !

नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाडी गेली वाहून; अपघातात सहा जण मृत्यूमुखी!


नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या केळवद येथील बामनमारी नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे. या गाडीत सहा जण होते. या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे. पुलावरून पाणी असताना वाहन चालकाने गाडी पुढे काढली. यादरम्यान, पाण्याचा ओढा आल्याने गाडी नदीत वाहून गेली. यावेळी गाडीत सहाजण प्रवास करत होते. या सहाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, शोध पथकाला तीन मृतदेह मिळाले आहेत. अजुनही तिघांचा शोध सुरू आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies