Type Here to Get Search Results !

बायकोच्या मदतीने, घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार!



दिल्ली: दिल्लीत एका चप्पल कंपनीच्या मॅनेजरने एका तरुणीवर बलात्कार केला. जेव्हा हा मॅनेजर तरुणीवर बलात्कार करत होता, तेव्हा त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिली.  याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मॅनेजरला अटक केली असून त्याची पत्नी फरार झाली आहे. जयप्रकाश असे आरोपीचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  पीडित तरुणी ही एका चप्पल बनवण्याच्या कारखान्यात काम करते. आरोपी जयप्रकाश हा त्याच कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. 15 जुलै रोजी आरोपी जयप्रकाश याने माझी बायको आजारी आहे असे म्हणत पीडित तरुणीला घरी बोलावून घेतले. घरी गेल्यानंतर त्यांच्या बायकोने तरुणीला एका रुममध्ये नेले. त्यानंतर आरोपी जयप्रकाश याने तरुणीवर बलात्कार केला. जेव्हा आरोपी तरुणीवर बलात्कार करत होता. तेव्हा त्याची बायको त्याला साथ देत होती. असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले. 



दरम्यान, बलात्कारानंतर आरोपी जयप्रकाश याच्या पत्नीने पीडितेला नशेचे द्रव्य पाजले. त्यानंतर आरोपीने पीडितेला तिला तिच्या घरासमोर नेऊन सोडले. पीडिता आपल्या घरात गेल्यानंतर बेशुद्ध झाली होती. दरम्यान, पीडितेच्या भावाने तिची विचारपूस केली असता. तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या भावाने तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर पिडीत शुद्धीत आल्यानंतर पोलिसांनी 16 जुलैला या पीडितेचा जबाब नोंदवला आणि बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies