रिलेशनशिपमध्ये नाते बिघडले तर बलात्काराचा आरोप होऊ शकत नाही: सुप्रीम कोर्टाने नोंदवले निरीक्षण!नवी दिल्ली : दोन व्यक्ती अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यातील नाते बिघडले, तर बलात्कार आरोप करणे योग्य नाही, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. राजस्थान येथील प्रकरणावर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे. राजस्थान येथील एका महिलेने पुरुषाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ती महिला आणि पुरुष गेल्या चार वर्षापासून एकत्र राहत आहेत. त्यांचे लग्न झालेले नाही. या नात्यातून त्यांना एक मुलगीही आहे. नंतर या पुरुष आणि महिलेतील संबंध बिघडले. यानंतर त्या महिलेने पुरुषाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी राजस्थान कोर्टाने त्या पुरुषाला जामीन मंजूर केला नाही. या प्रकरणी काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. राजस्थान कोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने बाजूला ठेवत, त्या पुरुषाला जामीन मंजूर केला आहे. जामीन देत असताना सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोदवले आहे. 'दोन व्यक्ती काही वर्षे एकत्र राहत असल्यास त्यांच्यातील नाते बिघडले तर बलात्काराचा आरोप होऊ शकत नाही, अस सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.


सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती विक्रम सेठ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. जर स्त्री आणि पुरुष सतत नातेसंबंधात असतील आणि नंतर संबंध बिघडले. तर बलात्काराचा आरोप असू शकत नाही. 'तक्रारदार महिलेचे त्या पुरुषासोबत सतत संबंध होते आणि हे संबंध चार वर्षे टिकले ही वस्तुस्थिती आहे. ती २१ वर्षांची होती जेव्हा तिने एका पुरुषासोबत रिलेशनशिप सुरू केले आणि तेव्हापासून ती सलग चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. ते नाते आता जपले नाही तर तो बलात्कार असू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.'जर महिलेने स्वत:च्या इच्छेने एखाद्या पुरुषाशी सतत संबंध ठेवले आणि नंतर संबंध तुटले, तर तो बलात्काराचा आरोप होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने राजस्थान उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामीन न देण्याचा निर्णय बाजूला ठेवला. सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण जामीन अर्जावरील निर्णयापुरते मर्यादित असून न्यायालयाच्या निरीक्षणाचा कोणताही परिणाम न होता या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला जाईल, असेही स्पष्ट केले.दरम्यान,  राजस्थानमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री दोघेही २०१५ पासून एकत्र राहत असल्याचे याचिकाकर्त्याच्या वतीने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. ही महिला विवाहित होती. महिलेने लग्नानंतर तिच्या पतीला घटस्फोट दिला होता. आणि संशयित आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आरोपीने लग्न करण्याचे वचन दिले होते आणि यादरम्यान एका मुलाचा जन्मही झाला होता. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.(सौ.साम)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured