Type Here to Get Search Results !

शिंदे गटाचे पुढचे लक्ष्य! 'शिवसेना भवन' वर घेणार ताबा?

 


मुंबई:  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता शिवसेनेचे १४ खासदारही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच, एकनाथ शिंदे गटाचे पुढचे लक्ष्य 'शिवसेना भवन' वर ताबा घेण्याचे असणार अशी माहिती समोर येत आहे. 



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दमदार बंड उभारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुढचे लक्ष्य ‘शिवसेना भवन’ वर ताबा करण्याचे असेल, अशी माहिती सध्या समोर येत आहे. दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वतःचीच शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा शिंदे गटाने दावा केला आहे.



दरम्यान, दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे गटात आहेत.तसेच, एकनाथ शिंदे यांनी आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यातच विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी स्वतःची निवड करताना आता शिवसेनेच्या राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीत देखील मोठी फूट पाडण्याची यशस्वी रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. तर भविष्यात शिवसेनेचे मुख्यालय 'शिवसेना भवन' यावरही शिंदे गट दावा करणार असल्याचे समोर येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies