Type Here to Get Search Results !

नदीपात्रात कार कोसळून अपघात; ९ जण मृत्युमुखी !




रामनगर :  उत्तराखंडमधून उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात नदीपात्रात कार कोसळून अपघात झाला आहे. या घटनेत कारमधील 9 जणांचा बुडून मृत्यू झाला. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रामनगर येथील ढेला नदीपात्रात ही घटना घडली. 


तसेच यात एका मुलीला वाचवण्यात यश आले. नदीत बुडालेल्या कारमधून शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व 9 मृतदेह बाहेर काढले . सर्व मृत पंजाबमधील आहेत.



ढेला नदीच्या परिसरात रात्री उशिरा 2 वाजेपासून पाऊस पडत होता. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरले होते. त्याचवेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार थेट पूलावरून वाहून जात नदीत कोसळली. या कारमध्ये एकूण 10 जण होते, त्यापैकी एक मुलगी बचावली आहे.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक लोकांनीही कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies