Type Here to Get Search Results !

देशात कोरोनाबाधितांमध्ये वाढ; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण!



नवी दिल्ली:  देशातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 60 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, सध्या देशात एक लाख लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे, आरोग्य प्रशासनासमोर मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे.



देशात वाढत्या कोरोना रुग्णांसह कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाली आहे. भारतात गुरुवारी दिवसभरात 60 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 1 लाख लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 21 हजार 219 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 31 लाख 71 हजार 653 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशात एकूण 5 लाख 25 हजार 930 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावला आहे.


दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्रात 2289 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. गुरुवारी सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies