Type Here to Get Search Results !

बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले, म्हणून १७ वर्षीय मुलीने...!



पुणे पुण्यातील अल्पवयीन मुलीने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याचा सुमारास हडपसर येथील एमनोरा पार्क परिसरात ही घटना घडली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, अवंतिका कुलशेखर असे १७ वर्षीय मुलीचे नाव आहे. अवंतीका पुण्यातील एमनोरा पार्क परिसरात आई-वडिलांसोबत राहत होती. अवंतिकाने चौदाव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरातून खाली उडी मारून आत्महत्या केली.  बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची  प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 


दरम्यान,  अवंतिकाला बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले होते, त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies