Type Here to Get Search Results !

‘मंकीपॉक्सला’ जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित!



नवी दिल्ली - गेल्या दोन वर्षांत जगभरातील बहुतेक देशांमध्ये, कोरोनाव्हायरस संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अश्तच  आता मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. 



जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनानंतर मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. यासोबतच WHO ने मंकीपॉक्सबाबत हाय अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ WHO आता मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर धोका म्हणून पाहत आहे. 70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या जास्त आहेत. त्यातच भारतातही तीन रुग्ण आढळले आहे.



दरम्यान, देशात १४ जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. तो रुग्ण युएईतून परतला होता. त्याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा हा व्हायरस आहे. जगभरात आतापर्यंत ६३ देशांमध्ये मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies