Type Here to Get Search Results !

लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या गाडीचा अपघात अन ; गाडीतील पंधरा जण....!



धुळे : धुळे तालुक्यातील वडेल येथून कंचनपूर येथे लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या आयशर गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुषांसह महिला व देखील समावेश आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने सदर वाहनाला उजव्या बाजूने धडक दिली. या अपघातात दहा ते पंधरा वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना सोनगीर टोल येथील रुग्णवाहिकेतून जिल्हा पाठविण्यात आले. 



दरम्यान, यासंदर्भात महामार्ग पोलीस त्याचबरोबर धुळे तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत. सुर्देवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies