Type Here to Get Search Results !

व्हिडीओ! चित्रा वाघांनी "महिलेसोबतचा" व्हिडिओ केला ट्विट; नाना पटोलेंनी दिले स्पष्टीकरण...!मुंबई:  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चेरापुंजीमधील एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा माझ्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन नाना पटोलेंचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ शेअर करत नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ पाहून धक्का बसल्याचे सांगतानाच नानांनी याबद्दल उत्तर द्यावे अशी मागणी केली. याच आरोपांवरुन नाना पटोलेंनी स्पष्टीकरण देताना हा लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले असून कायदेशीर मार्गेने उत्तर देऊ असे सांगितले.मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी, “नाना पटोलेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मला धक्काच बसला. ‘अशा’ पीडितांनी समोर यावे योग्य ती कारवाई होईल,” असे म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना, “सकाळपासून हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्ट येत नाही ती खासगी असते. मात्र जेव्हा ती सार्वजनिक जीवनामध्ये येते तेव्हा लोकप्रितिनिधी म्हणून त्यांना विचारले पाहिजे. त्यानुसार मी विचारलंय ट्वीट करुन त्यांना, “काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलातं” या कॅप्शनसहीत हा काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल या गाण्यासहीत एडीटींग केलेला व्हिडीओ ट्वीट केला.

या व्हिडीओच्या सुरुवातीला रोमान्स इन चेरापुंजी, मेघालय असे लिहिण्यात आले असून एक व्यक्ती एका महिलेच्या गळ्यात हात घालून बसल्याचे दिसत आहे. याच फ्रेममध्ये व्हिडीओत “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, काय आ***, नाना एकदम ओके” असा मजकूर लिहिण्यात आला. यात खुर्चीवर महिलेच्या खांद्यावर हात ठेऊन बसलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाहीत. त्या महिलेचाही चेहरा दिसत नाही. मात्र पुढच्या फ्रेममध्ये त्या व्यक्तीने जे टीशर्ट घातले आहे त्याच पद्धतीच्या आणि रंगाच्या टीशर्टमध्ये नाना पटोले अगदी पाश्चिमात्य पेरहावामध्ये दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी हे फोटो पोलो ऑर्कीड हॉटेलमधील असल्याचा दावा फोटोंसहीत करण्यात आला.चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले, “हे सगळे प्रकरण आमचे मिडीया सेल बघतय मी सध्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. आपल्या देशात राजकारणाची पातळी खाली उतरलेली दिसतेय त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना कसं बदनाम करता येईल असे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात आमची लीगल टीम कारवाई करत आहे. त्यांच्याबद्दल (चित्रा वाघ यांच्याबद्दल) मला काही बोलायचं नाहीय. खरं काय ते समोर येईल,”असे म्हटले आहे.(सौ.लोकसत्ता)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies