Type Here to Get Search Results !

कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ: दुकाने, शाळा, हॉटेल आठवडाभर राहणार बंद!



चीन : ओमिक्रॉनमुळे कोविडच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते याचा अंदाज आल्याने चीनमधील शीआन शहरात पुढील आठ दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी आज मध्यरात्रीपासून या शहरातील दुकाने, शाळा, हॉटेल तसेच गर्दी होणारी ठिकाणे एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. 



झांग झुएडोंग यांनी पत्रकार परिषदेत घेत शीआन शहरात सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा उपाय करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. 



दरम्यान,   आज (बुधवार) मध्यरात्रीपासून येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारच्या सूचनेनुसार पब, इंटरनेट कॅफे आणि कराओके बारसह सार्वजनिक मनोरंजन स्थळे देखील बंद राहतील. हॉटेल व्यावसायिकांनी केवळ पार्सल सुविधा द्यावी, शाळा आणि महाविद्यालयांनी देखील विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies