Type Here to Get Search Results !

शिवाजी आढळराव पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत, हातपाय तोडण्याची धमकी!


पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर आज शिवसैनिकांनी आढळराव यांच्याविरोधात आंदोलनही केले. दरम्यान, यावेळी काही शिवसैनिकांनी आढळराव पाटलांचे हातपाय तोडण्याची धमकीही दिली. त्यामुळे त्यांच्यावर राजगुरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.




शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. अशातच आढळराव पाटील यांच्याविरोधात मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी घोषणा देत पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन केले . त्यानंतर शिवसैनिकांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गद्दार-गाढव असे लिहीत निषेध व्यक्त केला. तसेच, यावेळी शिवसैनिकांकडून आढळराव पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.




दरम्यान, शिवसैनिकांनी आढळराव पाटील यांची बदनामी होईल असे कृत्य केले. त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाऴ करुन लांडेवाडी येथील घरी येऊन हात पाय तोडण्याची धमकी दिली. अशी तक्रार अंकुश शेवाळ यांनी पोलिसांत दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजगुरुनगर पोलिसांनी माजी जिल्हाप्रमुख राम गावडे माजी तालुकाध्यक्ष गणेश सांडभोर यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies