Type Here to Get Search Results !

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ६ जणांचा मृत्यू!



बिहार: बिहार राज्यातील छपरा गावात  अवैध फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. या स्फोटामुळे घरातील ६ जणांचे मृतदेह मिळाले आहेत तर, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनाकडून मतदकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, फटाक्यांसोबतच सिलिंडरचाही स्फोट झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्फोटाचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटामुळे इमारत कोसळली आहे, त्यामुळे ढिगारा हटवल्यानंतरच ही घटना कशी घडली हे तपासात पुढे येणार आहे. 



दरम्यान, याबाबत एसपी संतोष कुमार म्हणाले की, येथे स्फोटामुळे घर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही स्फोटामागील कारणाचा तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब निकामी पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies