Type Here to Get Search Results !

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन!



नवी दिल्ली:  जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले आहे. शिंजो आबे यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला, भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिंजो आबे यांच्या छातीजवळ गोळी लागली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


हल्ला झाल्यानंतर शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. 


दरम्यान, शिंजो आबे यांनी 2020 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत. गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांना पद्मविभूषण देऊन गौरविले होते. भारताशी संबंध ठेवण्यात त्यांनी नेहमीच भर दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies