Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार १६ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

सकारात्मक उर्जेने काम करावे. आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी. कौटुंबिक पाठिंबा मिळेल. छुप्या शत्रूंवर मात करता येईल.




वृषभ:-

संयमाची गरज भासेल. समोरील गोष्टींचा आनंद घ्याल. अनावश्यक खर्च टाळावेत. अडचणीतून मार्ग काढता येईल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.



मिथुन:-

बोलतांना संयम राखावा. आत्मविश्वास कायम ठेवा. कामात घाई गडबड करू नका. मनातील चुकीचे विचार बदलून टाका. कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलावीत.



कर्क:-

जवळचे मित्र भेटतील.  थोरांचे विचार जाणून घ्या. मानसिक ओढाताण जाणवू शकते. ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळवा. भावंडांचे सहकार्य मिळेल.



सिंह:-

सडेतोडपणे वागून चालणार नाही. योग साधनेकडे मन वळवावे. वैचारिक स्पष्टता ठेवा. मनाची द्विधावस्था होणार नाही याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण सुखकर राहील.



कन्या:-

ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. वेळच्या  वेळी निर्णय घ्यावेत.



तूळ:-

उगाच चिंता करत बसू नका.  वैचारिक एकसूत्रता ठेवावी. वादाचे प्रसंग टाळावेत. चांगली संगत लाभेल. मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडावे.



वृश्चिक:-

कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.   दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. उगाचच चिडचिड करून चालणार नाही. मानसिक शांतता लाभेल.



धनू:-

मन प्रसन्न राहील.  जुनी गुंतवणूक कामी येईल. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी कराल. एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल. नवीन योजनांवर विचार करावा.



मकर:-

इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवस आळसात घालवून चालणार नाही. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका.



कुंभ:-

मनातील नकारात्मक विचार काढून टाकावेत.  योग्य तर्क वापरावा लागेल. नामस्मरण करणे हिताचे ठरेल. भांडणापासून दूर राहावे. तडकाफडकी कोणतीही कृती करू नका. 



मीन:-

वाहन वेगावर मर्यादा घालावी. अनावश्यक खर्च टाळावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. संयम सोडून वागू नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies