Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार १८ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!




मेष:-

दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.  भागिदारीतून अपेक्षित लाभ होईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. थोडीफार खरेदी केली जाईल.



वृषभ:-

कलहकारक वातावरण टाळावे. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. गरजेच्या वस्तु खरेदी केल्या जातील.



मिथुन:-

ठामपणे निर्णय घ्यावे लागतील. आपल्याच मतावर अडून राहू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. भावनिक ताण कमी करावा. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल.



कर्क:-

हट्टीपणे वागाल. संयमाने काम साधावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवावी लागेल. गनीमी काव्याचा वापर कराल. जोडीदाराचे मत विचारात घ्या.



सिंह:-

तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. उत्साहाने कामे तडीस न्याल.  सकारात्मकता कमी पडू देऊ नका. मनावरील चिंतेचे मळभ दूर होईल. मुलांवरील विश्वास घट्ट होईल. 



कन्या:-

मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कौटुंबिक कामात लक्ष घालावे लागेल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. तडजोडीला पर्याय नाही. संयम सोडून चालणार नाही.



तूळ:-

मनात विशिष्ट हेतु घेऊन काम कराल. आपल्या आवडत्या गोष्टीत रमून जाल. ऊर्जा आणि उत्साह वाढेल. दिवस धावपळीत जाईल. हातातील कामात यश येईल.



वृश्चिक:-

कर्जाची प्रकरणे हातावेगळी करावीत.  उत्तराला प्रत्युत्तर द्याल. शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. बौद्धिक दिमाख दाखवाल. हमालीची कामे करणे टाळावे लागेल.



धनू:-

माणसामाणसातील फरक ओळखावा. आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जुन्या गोष्टींनी त्रस्त होऊ नका. दिवस कामाने व्यापलेला राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.



मकर:-

स्वावलंबन असणे आवश्यक आहे. तुमच्या ज्ञानात भर पडेल.   कामाची रूपरेखा ठरवा. दान-धर्म करण्याचा विचार कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. 



कुंभ:-

इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. नवीन मित्र जोडावेत. व्यावसायिक गोष्टीवर अधिक भर द्याल. धार्मिक गोष्टीत मन रमवा. विशाल दृष्टीकोन बाळगाल.



मीन:-

वाढीव कामे मागे लागू शकतात. जबाबदारी टाळून चालणार नाही. आततायीपणा आड येऊ देऊ नका. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies