“ सर्व देशातील सत्ता केंद्रित करण्याचे प्रयत्न भाजप करत आहे”: ‘यांचा’ भाजपवर हल्लाबोल!मुंबई:  भाजप सर्व यंत्रणांचा वापर करून राजकीय दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असून सर्व देशातील सत्ता केंद्रित करण्याचे प्रयत्न भाजप करत आहे तसेच, भाजप अशी सत्ता एकवटून, नागपुरातून दिली जाणारी विचारधारा पसरविण्याचे काम करत आहे. मात्र, सर्व सामान्य जनता हुशार आहे. अशी केंद्रित केलेली सत्ता फार काळ टिकत नाही असे म्हणत पवार यांनी  भाजपवर हल्लाबोल कला आहे.जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून, सुसंवाद ठेऊन लोकांचे प्रश्न सोडवा, असे आवाहन पक्षातील नेत्यांना केलं. ते म्हणाले, '५५ वर्षाच्या कारकिर्दीत ३० वर्ष विरोधात होतो, २५ वर्ष सत्तेत होतो. त्यात विरोधी पक्षात असताना ३० वर्षात पक्ष वाढीला चालना मिळाली. आता आपण विरोधी पक्षात आहोत, असेही पवार म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज YB सेंटर येथे राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना पवार यांनी भाजपवरती निशाणा साधला, या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured