Type Here to Get Search Results !

मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास पतीनेच दिला पाठींबा!



पुणे :  बारामती तालुक्यातील एका गावात नराधम पतीने आपल्या मित्रालाच पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची घटना घडली.  याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला. शेखर माळशिकारे (ता. बारामती) असे आरोपी मित्राचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  आरोपी शेखर हा पीडित महिलेच्या पतीसोबत तिच्या घरी आला होता. यावेळी दोघांनीही मद्यप्राशन करून जेवण केले. त्यानंतर पीडितेच्या पतीने शेखर याच्यासोबत पत्नीला शारिरीक संबध प्रस्तापित करण्यास भाग पाडले.



रात्री उशिरा संबंधित महिलेच्या पतीने आपल्या मित्राला या पत्नीवर अत्याचार करायला लावला. तसेच,  जेव्हा आरोपी शेखर हा पीडित महिलेवर बलात्कार करत होता. तेव्हा महिलेचा पतीही त्याला हे कृत्य प्रवृत्त करत होता. याशिवाय, पीडितेने अत्याचार होत असताना विरोध केल्याने आरोपी शेखर आणि तिच्या पतीने पीडितेला मारहाण केली. 


दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पीडितेने सोमवारी सकाळी बारामती पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीसह आरोपी माळशिकारे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies