Type Here to Get Search Results !

धक्कादायक! ३४ अब्ज रुपये लाईट बिल आल्याने सुनेचा बीपी वाढला! तर सासरे रुग्णालयात दाखल

 


नवी दिल्ली:  वीज बिल खूप वाढून येते. २०० ते ५०० रुपये येणारे वीज बिल काहीवेळा हजारांत येते. पण आता एक वीज बिल अब्जात आलेले समोर आले आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार समोर आला. ग्वाल्हेरमध्ये वीज विभागाने एका कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचे बिल दिल्याने सासरे आणि सुनेला मोठा धक्का बसला. या वीज बिलातील आकडा पाहून सुनेचा बीपी वाढला आहे, तर सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.


हे धक्कादायक प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या शिव बिहार कॉलनी येथील आहे. येथे राहणारे संजीव कनकणे हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांची पत्नी प्रियांका गुप्ता गृहिणी आहे. त्यांना जुलै महिन्यातील वीज बिल आले. तेव्हा ते बिल पाहून कुटुंबातील सर्व सदस्यांचा घाम फुटला.


 त्यांचे जुलै महिन्यातील बिल ३४ अब्ज रुपयांपेक्षा जास्त आले, ते पाहून त्यांची पत्नी प्रियंका यांचा बीपी वाढला आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडली. तर त्यांचे वडील राजेंद्र प्रसाद गुप्ता यांना अगोदरच हृदयाचा त्रास आहे. त्यांना आलेले बिल पाहून त्यांचा रक्तदाब वाढला. यानंतर वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies