Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार १४ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

आवडते खाद्यपदार्थ खाल. पैशाची गुंतवणूक योग्य सल्ल्याने करावी. गोड बोलण्याने इतरांवर छाप पाडाल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सामाजिक कार्याबद्दल मनात ओढ निर्माण होईल.

वृषभ:-

तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस मनाजोगा घालवाल. मनातील जुनी हौस पूर्ण कराल. सर्व गोष्टींकडे आनंदी नजरेतून पहाल.



मिथुन:-

हातातील कामाला यश मिळेल.उत्तम शय्यासौख्य लाभेल.  क्षणिक आनंदाच्या गोष्टी कराल. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. 

कर्क:-

व्यवसायातून चांगली कमाई करता येईल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. पि‍छेहाटीला घाबरून जाऊ नका.



सिंह:-

आपल्या वागण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.   औद्योगिक वातावरण चांगले राहील. तुमच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले जाईल. व्यावसायिक स्तरावर खुश राहाल.

कन्या:-

परोपकाराचे महत्त्व पट‍वून द्याल.  विशाल दृष्टीकोन बाळगावा. लेखनाचे कौतुक केले जाईल. तुमच्या कलेला चांगला वाव देता येईल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. 



तूळ:-

रेस, सट्टा यांसारख्या गोष्टीतून धनलाभ संभवतो.  व्यापारी वर्ग खुश राहील. कमी श्रमात कामे करण्याकडे कल राहील. वारसाहक्काच्या कामांना गती येईल. सासुरवाडीची मदत घेता येईल. 

वृश्चिक:-

जोडीदाराची कर्तव्यदक्षता दिसून येईल.  उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.  एकमेकांचे विचार जाणून घ्याल. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्यावेत. क्षुल्लक गोष्टी क्रोधाला कारणीभूत ठरू शकतात.



धनू:-

दिवस सुस्तपणात घालवाल. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील अशी अपेक्षा ठेऊ नका. काही गोष्टींना मुरड घालावी लागेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.  आळस झटकून कामाला लागावे. 

मकर:-

प्रेमभावना वाढीस लागेल.  आवडत्या व्यक्तीच्या सहवासाची ओढ वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नवीन ओळखी वाढतील. त्यातूनच मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील. 



कुंभ:-

जोडीदाराकडून कौतुक करून घ्याल. कौटुंबिक बाबतीत समाधानी असाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.  ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. 

मीन:-

साहित्याची आवड जोपासाल. डोकेदुखीचा थोडाफार त्रास जाणवेल.  कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कला जोपासण्यासाठी तांत्रिक बाबी जाणून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies