Type Here to Get Search Results !

सतत एकाच जागी बसल्यामुळे ‘हा’ आजार उद्भवू शकतो! जाणून घ्या...!



मुंबई :  आपल्याला सतत मानेच्या व कंबरेच्यामध्ये दुखण्याचा त्रास होत असेल तर ते सरव्हायकल पेन असू शकते. हा त्रास एकाच जागी ८ ते ९ तास बसल्यामुळे होतो. त्यामुळे कंबरेच्या मागील भागापासून ते मानेपर्यंत हे दुखणे सुरु होते. एकाच ठिकाणी सतत बसल्यामुळे व शरीराची हालचाल न केल्यामुळे या स्पाँडिलायसिसची समस्या होते. यामध्ये चक्कर येण्याची लक्षणे अधिक दिसून येतात. 



सतत एकाच जागी बसल्यामुळे आपल्याला मानदुखीचा त्रास सुरु होतो. याचे दुखणे खांद्यावर, पाठीच्या वरच्या भागात, कमरेच्या मध्यभागी कुठेही होऊ शकते.अशा परिस्थितीत चक्कर येणे, मायग्रेन, हलके दुखणे, तीव्र वेदना किंवा झोप येणे अशी लक्षणे दिसू शकतात. खूर्चीवर बसताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.



यासाठी खालील टिप्स फॉलो करा:

खुर्चीवर बसताना आपल्या पाठीचा कणा अगदी सरळ असावा व पाय जमिनीवर सरळ ठेवा.

खुर्चीवर बसताना आपली बसण्याची पध्दत व्यवस्थित असावी.

पाठीचा कणा व मान सरळ ठेवा. सतत एकाच स्थितीत बसू नका. 

लॅपटॉपपासून अंतर ठेवा ज्यामुळे आपली मान वाकली जाणार नाही. 

दर २० मिनिटांनी आपण शरीराची हालचाल करायला हवी. 

रोज सकाळी व्यायाम करा. त्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies