व्हॉट्सअॅप यूजर्सना सावधानतेचा इशारा; ‘यामुळे’ तुमची प्रायव्हेसी येऊ शकते धोक्यात!नवी दिल्ली: जगातील सर्वात लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अँड्रॉइड यूजर्सना सावधानतेचा इशारा दिला आहे. गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपसारखेच दिसणारे अनेक फेक अॅप्स आहेत. या अॅप्समुळे यूजर्सचा डेटा चोरी होऊन प्रायव्हेसी धोक्यात येऊ शकते, त्यामुळे अशा खोट्या अॅप्सपासून दूर राहावे आणि ते डाऊनलोड करु नये तसेच वापरुही नये असा इशारा कंपनीद्वारे वापरकर्त्यांना दिला आहे. व्हॉट्सअॅपचे हेड (प्रमुख) विल कॅथकार्ट यांनी याबाबत ट्विट करत हा इशारा दिला आहे. विल कॅथकार्टने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनीच्या सिक्युरिटी रिसर्च टीमला काही बनावट अॅप्स सापडले आहेत, जे व्हॉट्सअॅपसारखी सर्विस देतात आणि त्यांचा लोगोही काहीसा तसाच आहे. "अलीकडेच आमच्या सिक्युरिटी रिसर्च टीमला गुगल प्ले स्टोअवर HeyMods नावाच्या डेव्हलपरचे काही अॅप्स सापडले आहेत. या अॅप्समध्ये अनेक मालवेअर्स लपल्याचे आढळले, ज्यात Hey WhatsApp आणि इतर अनेक अॅप्स समाविष्ट आहेत," असे त्यांनी ट्विट केले आहे.


तसेच ते पुढे म्हणाले, "या अॅप्सने नवीन फीचर्स देण्याचे आमिष दिले  होते,  परंतु लोकांच्या फोनमध्ये स्टोअर असलेली वैयक्तिक माहिती आणि डेटा चोरण्यासाठी तो एक घोटाळा होता. आम्ही ही माहिती गुगलसोबत शेअर केली आहे आणि आम्ही या अॅप्सचा सामना कसा करायचा यावर काम करत आहोत. "अँड्रॉइडसाठी गुगल प्ले प्रोटेक्टकडून प्री-डाउनलोड केलेले फेक व्हॉट्सअॅप व्हर्जन्स शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अँड्रॉइडसा डिव्हाइसवर फेक अॅप्स थांबवण्यासाठी आम्ही गुगलसोबत काम करत आहोत असे कॅथकार्ट म्हणाले आहेत. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured