Type Here to Get Search Results !

‘येथे’ ढगफुटी, ४ लोक बेपत्ता; ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा!



शिमला:  कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यात ढगफुटीसारखा पाऊस सुरू आहे, पुरामुळे कॅम्पिंगची जागा वाहून गेली असून चार लोक बेपत्ता आहेत.तसेच घरेही पाण्याखाली गेली असून, पुलाला तडे गेले आहेत.



या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. रात्रीपासून कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडत सुरु. मलाणा येथील धरणाच्या जागेचे मोठे नुकसान झाले आहे. हिमाचलमधील हवामान विभागाने बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


बुधवारपासून तीन दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी शिमला, सोलन, सिरमौर, बिलासपूर आणि कांगडा येथे येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यात हिमाचलमध्ये ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies