Type Here to Get Search Results !

“बेडरुममध्ये कोण काय करतंय यासाठी आपण राजकारणात आहात का?”: ‘यांची’ चित्रा वाघ यांच्यावर टीका!



मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाना पटोले यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीकेचे झोड उठवली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही नाना पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला होता. चित्रा वाघ यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आता मैदानात उतरल्या आहेत. "बेडरूममध्ये कोण काय करतंय, यासाठी आपण राजकारणात आहात का?" असा प्रश्न करत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक टीका केली आहे.



भाजपच्या चित्राताईंनी कॉंग्रेसच्या नाना पटोलेंचा एक खाजगी व्हिडिओ शेयर केला आहे. मुळात आपण राजकारणात कशासाठी आलो आहोत? विरोधकांची अनैतिक संबंध काढणं, ताकझाक करणं हा आपला विकास आहे का? तुमच्याही पक्षातल्या (भाजपच्या) नेत्यांचे खाजगी व्हिडिओ बाहेर आले आहेत. कोणाच्याही खाजगी आयुष्यातले व्हिडिओ अशाप्रकारे पोस्ट करता येत नाही. आपल्याला कुणी अधिकार दिला की, त्याच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ अशाप्रकारे शेयर कारायचा? मुळात तुमच्या लोकांचे जे अनैतिक सबंध आहेत, ज्या महिला तक्रार करतात त्यांनी तो दिला. पण, हा व्हिडिओ त्या महिलेने दिलेला नाही. तरिही तुम्हाला विरोधकांच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ पाठवणे, ते बघणे, त्यांचे कुठे-कुठे अनैतिक संबंध आहे हे बघणे हे तुम्हाला शोभत नाही.



आपल्या समाजात अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. परंतू सातत्याने भाजकडून महागाई, बेरोजगारी यासारखे मोठे प्रश्न सोडून लोकांच्या खाजगी आयुष्यात दखल देणं बंद करा. ते राजकारणी असले तरी ते माणसे आहे. त्यांना त्यांच आयुष्य आहे. कुणावर जर खरा अन्याय झाला असेल करत त्याची पडताळणी करुनच राजकारणी नेत्यांनी बोललं पाहिजे. पूजा राठोड प्रकरणातही तसेच झाले. संविधान आहे. त्यानुसार चालावे लागते. आज ज्या नेत्यावर आले होते ते भाजमध्ये आले आहेत ते वॉशिंगमशीनसारखे स्वच्छ झाले आहेत, ही कुठली पद्धत आहे? राजकारणात विकास सोडून कोण कुठं आंघोळ करतंय, कोण कुठं बेडरुममध्ये काय करतंयं यासाठी आपण राजकारणात आहोत का? असा प्रश्न करत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे चित्रा वाघ यांच्यावर खोचक टीका केली आहे






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies