Type Here to Get Search Results !

तृतीयपंथीयांच्या पार्टीमध्ये राडा; भांडणात तरुणाचा मृत्यू!



पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील भुजबळ चौक येथील बार हिस्ट हॉटेलमध्ये काल रात्री दोन वाजताच्या जवळपास तृतीयपंथीयांची एक पार्टी सुरू होती. ही पार्टी सुरू असताना त्या ठिकाणी भांडण झाले.



या भांडणात अभय गोडाणे या युवकाला मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली होती. मारहाण झाल्यामुळे अभयने स्वतःचा जीव वाचविण्याकरिता बारच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली यात तो गंभीर जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान अभयचा मृत्यू झाला आहे.


दरम्यान, या प्रकरणात पाच सहा जणांना अटक केली असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies