Type Here to Get Search Results !

शिवसेनेस मनसेचा मोठा दणका ; १२० रिक्षाचालकांचा मनसेत प्रवेश!



डोंबिवली : गेले काही दिवस महाराष्ट्र राजकारणात रिक्षावाला हा शब्द खूप गाजत आहे. त्यातच आता मनसेने शिवसेनेला झटका देत शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल १२० रिक्षाचालकांनी मनसेच्या संघटनेत प्रवेश केला आहे.



आता डोंबिवलीत मनसेने शिवसेनेला झटका दिला आहे. शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल १२० रिक्षाचालकांनी मनसेच्या संघटनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या माध्यमातून व मनसे पदाधिकारी प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून ठाकुर्ली रेल्वे स्थानक शेजारील रिक्षा थांब्याचे नुतनीकरण करण्यात आले. हे १२० रिक्षाचालक गेले ३० वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून रिक्षा संघटनेत कार्यरत होते. 



दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपद असा झाला. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे यांना रिक्षावाला म्हणून हिणवले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सेना नेत्यांना जशास तसे उत्तर दिले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies